मी................

मी या अवकाशी

या धरेवरचा प्रवाशी

खेळ माझा जिवनाशी

नाते माझे सर्वांशी

धरू कोणा ऊराशी

नउ ग्रह नउ राशी

सारे आहेत सरशी

गुरफटले आहेत सुर्याकाशी

नाते सर्वांचे हरएकाशी

भविष्यभार एका आकाशी

काय करावे काबाकाशी

नका विसरू मायबापाशी

एक तेच सारे एकाशी

मोकाट तू का रे फिरशी

नर-नारी स्वर्ग शोधशी

धन-ऋण नाते शुन्याशी

येथेच तू शुन्य घडवशी

शुन्य-एकाने आपण या विश्वाशी