भरारी स्वर्गाची.............

एक आपल्यांतला सर्वसामान्य चायवाला',

घर, चाळी, झोपडीतल्या आईबाप, भावंडांतला,

भुमातेच्या तळावर हा साई जन्मला,

चहा, मेहनत नि शिक्षणाने तो मोठा झाला,

तरी म्हणती लोक त्याला चायवाला'!

 

सर्वसामान्य तुला असेच ऒळखणार,

तुझीच माणसे तुला ऒळख दाखवणार,

भांडवलदार नि उच्चभ्रूंना तर

हे कदापीही भावणार!

 

मानसीक ताण तुझा कधी ना संपणार,

जगाची पर्वा तुला, यातच तुला आनंद मिळणार,

जाणत्यांनी नि जगाने ऒळखले असले जरी तुला,

ऒळखण्याची पत ज्यांची आहे भावा!

 

ज्यांनी नरकात दिवस काढले,

स्वर्गाचे साम्राज्य त्यांना काय कळणार,

तुझा प्रवास नरकातून स्वर्गात,

वटेवरच्या काटकुट्यांचा अनुभव आला!

 

अनुभव नसतां, फुकाच्या वल्गना करणार,

ज्ञानाचे प्रदर्शन करणार,

थवेच्या थवे तुझ्याभवती राहणार,

काळे कावळे, कावकावच करणार!

 

ताकद तुझी भारी, प्रारब्ध तुझे साथीला,

ना कोणी रोखू शकणार, तुझे लक्ष्य',

नोटाबंदीने साधले तू काळे भक्ष्य'!

धाडसी तुझा हा निर्णय भारी!

 

भोळीभाभडी जनता, ज्ञानी, रे भावा,

प्रवास स्वर्गदिशेचा त्यांचा फारच थोडा!

ज्ञानानेच केला आहे रे सारा घोटाळा,

भांडवलशाहांचीसुद्धा यामुळेच भरली शाळा!

 

सद्सद्विवेकबुद्धी', दडली अंधारात,

समाजाची कोंडी झालीय् सारी चलनात!

मेहनत जाते वाया, स्वप्नाच्या जाळ्यात,

शेतकरी देखील जीव देतो याच विचारात!

 

ज्ञानी आपले बंधू, पाळती अंधविश्वासाला,

धावेल तो भगवान का रे त्यांच्या हाकेला?

आरक्षणाने आपण आपले कंबरडे मोडतो,

आम्ही जनसामान्य आपल्यालाच का आपण कमजोर करतो?